Paris Olympics 2024 (Vinesh Phogat disqualified) – ऑलिम्पिकमधील महिला ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत पोचल्यानंतर अपात्र ठरलेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनार्थ जपानचा पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राई हिगुचीने पोस्ट केली आहे.
विनेशच्या निवृत्तीच्या घोषणेवर भाष्य करताना त्याने ‘एक्स’ वर लिहिले, ‘मी तुझे दुःख चांगले समजू शकतो. फक्त 50 ग्रॅम. इतर काय म्हणतील याची काळजी करू नकोस. आयुष्य कोणासाठी थांबत नाही ते पुढे जात राहते. अपयशातून सावरणे ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे, स्वतः सावर, नीट आराम कर.’
I understand your pain the best.
same 50g.
Don’t worry about the voices around you.
Life goes on.
Rising from setbacks is the most beautiful thing.
Take a good rest. https://t.co/KxtTMw4vhL— Rei Higuchi (@Reihiguchi0128) August 9, 2024
हिगुचीने 57 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्य फेरीत भारताच्या अमन सेहरावतचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर त्याने पुढे सुवर्णपदकही जिंकले आहे.
विनेशला पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या हिगुचीला तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतून केवळ 50 ग्रॅम वजनामुळे बाहेर काढण्यात आले होते. यानंतर तो आपल्या घरच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर त्याने यंदा सुवर्णमय कामगिरीची नोंद केली आहे.