Paris Olympics 2024 | मनु भाकरने पटकावले सलग दुसरे पदक; सरबजोतच्या साथीने रचला इतिहास

Paris Olympics 2024 | पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आणखी पदक मिळाले आहे. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू आणि सरबजोतनं शूटींगच्या 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदक मिळवले आहे. याआधी मनु भाकरने 28 जुलैला पॅरिस ऑलिम्पिकच्या 10 मीटर एयर पिस्तुल सिंगल्स इवेंटमध्ये ब्रॉन्ज मेडलवर नेम साधला होता.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदक मिळवणारी मनू पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी मनू भाकर पहिली भारतीय ठरली होती. दरम्यान, एकेरीत निराशा पदरी पडल्यानंतर सरबजोत नव्या उमेदीनं रेंजवर उतरला आणि दोघांनी मिळून मोठा विजय मिळवला. मनू आणि सरबजोत या भारतीय जोडीनं साऊथ कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन या जोडीचा 16 -10 असा पराभव केला.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनु ठरली पहिली खेळाडू
मनु आणि सरबजोत यांनी क्वालिफायरमध्ये एकत्रितपणे 580 गुण नोंदवून तिसरे स्थान पटकावले तर कोरियन जोडीने 579 गुणांसह चौथ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले होते. विशेष म्हणजे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली.1900 च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. प्रिचार्डनंतर एकाही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकता आले नाहीत. Paris Olympics 2024 |
Our shooters continue to make us proud!
Congratulations to @realmanubhaker and Sarabjot Singh for winning the Bronze medal in the 10m Air Pistol Mixed Team event at the #Olympics. Both of them have shown great skills and teamwork. India is incredibly delighted.
For Manu, this… pic.twitter.com/loUsQjnLbN
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
ऑलिम्पिकमध्ये आणखी दुसरे पदक मिळवणाऱ्या मनू भाकर आणि सरबजोत सिंगचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी लिहिले, “आमच्या नेमबाजांनी आम्हाला अभिमान वाटतो आणि ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. दोघांनी उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरी दाखवली. भारत अत्यंत आनंदी आहे. “मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे त्याची निरंतर उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवते.” Paris Olympics 2024 |
हेही वाचा:
“रमेश केरे पाटील भाजपचा माणूस” ; मोर्चाच्या आंदोलनावरुन अंबादास दानवेंचा गंभीर आरोप





