Paris Olympics 2024 (Badminton) : दुर्दैव…! लक्ष्य सेनचा पहिला विजय ठरविण्यात आला अवैध; जाणून घ्या, नेमकं कारण काय….

Paris Olympics 2024 (Badminton, Lakshya Sen vs Kevin Cordon) : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी अन् निराशजनक बातमी आली आहे. रविवारी झालेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता. मात्र आता त्यांचा विजय अवैध ठरविण्यात आला आहे. कारण लक्ष्य सेन ज्या खेळाडूला पराभूत केले होते तो दुखापतीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत आता लक्ष्यला पुन्हा पहिल्या फेरीचा सामना खेळावा लागणार आहे.
वास्तविक, रविवारी ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन आणि ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन यांच्यात सामना पार पडला. सुमारे 42 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय शटलर लक्ष्य सेनने केविनचा 21-8, 22-20 असा पराभव केला होता.
मात्र आता हा सामना जिंकूनही भारताचे लक्ष्य सेनचा पराभव झाला आहे. केविन कॉर्डन दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. केविनच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. कॉर्डनच्या माघारीमुळे त्याचा आणि लक्ष्य यांच्यातील सामन्याचा निकाल रद्द झाला आहे. या सामन्याचा निकाल ऑलिम्पिकमधून काढून टाकण्यात आला आहे. याचा अर्थ लक्ष्याचा केविन कॉर्डनवरचा विजय मानला जाणार नाही. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनची पहिल्या सामन्यातील सर्व मेहनत वाया गेली आहे.
🇮🇳🚨 𝗧𝗼𝘂𝗴𝗵 𝗯𝗹𝗼𝘄 𝗳𝗼𝗿 𝗟𝗮𝗸𝘀𝗵𝘆𝗮! Kevin Cordon withdraws from #Paris2024 due to an elbow injury, virtually “deleting” Lakshya Sen’s victory over him.
🏸 The deletion means that Lakshya’s win over Kevin Cordon won’t count towards the standings and also means that… pic.twitter.com/wvEusDVlIP
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 28, 2024
सेनचा विजय का ठरवला गेला ‘अवैध’? जाणून घ्या….
लक्ष्य बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या गट-एलमध्ये आहे. या गटात लक्ष्यासह एकूण 4 खेळाडू होते. लक्ष्य सेनविरुद्ध पराभूत झालेला केविन कॉर्डनही याच गटाचा भाग होता. पण आता केविनने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून आपले नाव मागे घेतले आहे. केव्हीन कार्डने माघार घेतल्यानंतर आता बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या ग्रुप-एलमध्ये लक्ष्य सेन, इंडोनेशियाचा क्रिस्टी जोनाथन आणि बेल्जियमचा कॅरागी ज्युलियन उरले आहेत.
नियम काय सांगतो..?
बॅडमिंटन जागतिक महासंघ (BWF) ग्रुप स्टेजच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली, तर त्याच्याद्वारे खेळलेल्या सर्व सामन्यांचे निकाल रद्द केले जातात. आणि याच नियमाचा लक्ष्य सेनला फटका बसला. आता लक्ष्याच्या एल गटातील उर्वरित दोन सामन्यांच्या निकालाच्या आधारे मानांकन निश्चित केले जाईल.
पुढील सामने…
केव्हीन कार्डने माघार घेतल्यानंतर आता लक्ष्यला त्याच्या गटातील सर्व खेळाडूंपेक्षा एक सामना जास्त खेळावा लागणार आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या ग्रुप-एलमध्ये लक्ष्यचा पुढील सामना आज (29 जुलै) रोजी कॅरागी ज्युलियनशी होईल आणि त्यानंतर त्याचा शेवटचा सामना बुधवारी (31 जुलै) क्रिस्टी जोनाथनशी होईल.





