parineeti chopra: लाडक्या मावशीचं प्रेम! परिणीतीच्या बाळासाठी प्रियांका चोप्राकडून खास भेट; फोटो झाले व्हायरल

parineeti chopra: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी ऑक्टोबरमध्ये पालकत्वाचा आनंद जाहीर केला होता. १९ ऑक्टोबरला परिणीतीला गोंडस मुलगा झाला आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. परिणीतीची चुलत बहीण, ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने देखील त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या.
आता प्रियांकाने लाडका भाचा ‘नीर’ साठी पाठवलेली खास भेटवस्तू सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परिणीतीने स्वतः ही गिफ्ट सेटची झलक इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘मिमी मावशी’चे आभार मानले आहेत.
प्रियांकाकडून ‘नीर’साठी खास बेबी गिफ्ट सेट
देसी गर्लने आपल्या भाच्यासाठी छानशा भेटवस्तू पाठवल्या आहेत,
- गोंडस बेबी कपडे
- मऊ टेडी बिअर
- छोटेखानी शूज
- दोन हेअर ब्रश
- पूर्ण बेबी-केअर हॅम्पर
यावरच्या गिफ्ट कार्डवर विशेष लिहिलं होतं,
“चोप्रा-जोनस कुटुंबीयांकडून खास गिफ्ट”
हा फोटो परिणीतीने शेअर करत लिहिलं,
“आमच्या नीरकडून खूप खूप आभार… थँक्यू मिमी मावशी, निक काका आणि मालती दीदी!”

‘नीर’, परिणीतीच्या मुलाचं सुंदर नाव आणि अर्थ
मुलगा १ महिन्याचा झाल्यावर परिणीती आणि राघव यांनी त्याचं नाव जाहीर केलं,‘नीर’ असं.
त्याचा अर्थही खूप सुंदर आहे. परिणीतीने कॅप्शनमध्ये संस्कृत श्लोक लिहित सांगितलं—
“जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर!”
म्हणजे, पाण्यासारखं स्वच्छ, प्रेमासारखं पवित्र, तसंच आमचा नीर!
ती पुढे लिहिते, “Neer – शुद्ध, दिव्य आणि अमर्याद!”
प्रियांका भारतात कशासाठी आली होती?
- गेल्या काही दिवसांपासून प्रियांका भारतात आहे.
- एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटाच्या लॉन्चसाठी ती भारतात आली होती.
- लॉन्चनंतर ती मित्रमंडळीसोबत गोवा फिरतानाही दिसली.
- याचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- ‘वाराणसी’ हा बहुचर्चित सिनेमा २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.





