Parbhani News : परभणी पालिका कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; प्रलंबित पगाराबाबत सहमती झाल्यानंतर निर्णय
परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी (Parbhani News) आपला संप तात्पुरता स्थगित केला. १५ सप्टेंबरपर्यंत दोन महिन्यांचा प्रलंबित पगार दिला जाईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Parbhani News : परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी (Parbhani News) आपला संप तात्पुरता स्थगित केला. १५ सप्टेंबरपर्यंत दोन महिन्यांचा प्रलंबित पगार दिला जाईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
प्रलंबित पगाराची अदा करणे, पालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ आणि जीएसटी अनुदानातील थकीत फरक मिळणे (Parbhani News) या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी जारी केलेल्या लेखी पत्रकानुसार, कर्मचाऱ्यांचा सध्या प्रलंबित असलेला दोन महिन्यांचा पगार १५ सप्टेंबरपर्यंत अदा केला जाईल. तसेच, उर्वरित पगाराची थकबाकी पुढील ३० दिवसांत निकाली काढण्यासाठी प्रशासन व्यवस्था करेल, असेही त्यांनी नमूद केले.
शासनाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी (Parbhani News) एक समिती स्थापन केली जाईल, असे जीएसटी अनुदानात वाढ आणि अनुदानातील थकीत फरक या मागण्यांबाबत पालिका प्रशासनाने सांगितले.






