‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा

Abdu Rozik Engagement| ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नुकतेच अब्दु रोझिकने त्याचे साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
अब्दु रोझिकने इंस्ट्रग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अब्दु एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे. फोटो शेअर करत अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,”Allhamdulillah 24.04.2024″. याचा अर्थ अब्दुने अमीरासोबत 24 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा केला आहे. अब्दु आणि अमीराचा साखरपुडा दुबईत पार पडला असून येथेच ते लग्न देखील करणार आहे. Abdu Rozik Engagement|
View this post on Instagram
अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने लवकरच विवाह करणार असल्याचे सांगितले होते. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने म्हटले होते. Abdu Rozik Engagement|
दरम्यान, ‘बिग बॉस 16’ मध्ये अब्दु रोझिक झळकला होता. या शोमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या शोनंतर तो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे.
हेही वाचा:
ब्रिजभूषण शरण सिंह यांची भाजपमधून होणार हकालपट्टी ? ; मुलाचे तिकीटही परत केले जाणार?





