Paracetamol: घराघरातली ही गोळी ठरू शकते ‘सायलेंट किलर’! डोळे बंद करून गोळी खाणं ठरू शकत धोकादायक
आजकाल अनेक जण सर्दी-खोकला, वेदना यासाठी वेगवेगळ्या गोळ्या एकत्र घेतात. मात्र, या अनेक औषधांमध्ये आधीच पॅरासिटामोल असतं. त्यामुळे नकळत या औषधाचं प्रमाण खूप वाढतं.

Paracetamol: पॅरासिटामोल ही अशी गोळी आहे जी जवळपास प्रत्येक घरात सहज सापडते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी झाली की डॉक्टरांचा सल्ला न घेता अनेक जण लगेच ही गोळी घेतात.
ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे, असं आपल्याला वाटतं. पण तज्ज्ञांच्या मते, पॅरासिटामोलचा (Paracetamol) वारंवार किंवा जास्त प्रमाणात वापर आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो.
जगभरात लीव्हर खराब होण्याच्या अनेक प्रकरणांमागे पॅरासिटामोल हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं डॉक्टर सांगतात. सुरुवातीला साधी वाटणारी ही गोळी हळूहळू शरीरासाठी ‘स्लो पॉइझन’ ठरू शकते.

Paracetamol
पॅरासिटामोल म्हणजे नेमकं काय?
पॅरासिटामोल आपण क्रोसिन, कॅलपोल, डोलो ६५० अशा नावांनी ओळखतो. ही गोळी प्रामुख्याने ताप कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते.
जास्त वापर का ठरतो धोकादायक?
पॅरासिटामोलचं विघटन करण्याचं काम लीव्हर करतं. पण जर ही गोळी वारंवार किंवा ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त घेतली, तर लीव्हरवर जास्त ताण पडतो. त्यामुळे लीव्हर डॅमेज होण्याचा धोका वाढतो.
आजकाल अनेक जण सर्दी-खोकला, वेदना यासाठी वेगवेगळ्या गोळ्या एकत्र घेतात. मात्र, या अनेक औषधांमध्ये आधीच पॅरासिटामोल असतं. त्यामुळे नकळत या औषधाचं प्रमाण खूप वाढतं.

paracetamol
पॅरासिटामोल घेण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पॅरासिटामोल घेऊ नका
- एकाच वेळी अनेक औषधे घेण्याआधी त्यावरील लेबल नक्की वाचा
- २–३ दिवसांत ताप किंवा वेदना कमी होत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
- मद्यपान करणाऱ्यांनी पॅरासिटामोल टाळावा
पॅरासिटामोल ही वाईट गोळी नाही, पण तिचा चुकीच्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पुढच्यावेळी गोळी घेण्याआधी थोडा विचार करा. कारण, आरोग्याबाबतची सावधगिरी हाच सर्वात मोठा बचाव आहे.





