पापाराझी जान्हवी कपूरचे फोटो क्लिक करत होते; ती वाट पाहत होती, कोणाची? एअरपोर्टवर काय घडलं? पाहा व्हिडीओ

Janhvi Kapoor : आज मुंबई विमानतळावर बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर एका खास व्यक्तीची वाट पाहताना दिसली. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगमी “सनी कुमारी की तुलसी कुमारी” या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामुळे जान्हवी चर्चेत आहे. या व्हिडीओत जान्हवी एअरपोर्टवर दाखल होताच तिचे पापाराझी फोटो क्लिक करत आहेत. पण अभिनेत्रीचे लक्ष मात्र दुसरीकडेच असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
या व्हिडीओत तिचा लूकही खूप छान दिसत आहे. तिने ब्राऊन रंगाचं जॅकेट वेअर केले असून डोळ्यांवर गॅागल घातला आहे. हा लूक तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. विमानतळावर गाडीतून उतरल्यानंतर जान्हवीने पापाराझींसाठी अनेक मनमोहक पोझ दिल्या. मात्र ती कोणाची तरी वाट पाहत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
View this post on Instagram
काही वेळातच तिथे अभिनेता वरुण धवण याची एंन्ट्री होते आणि त्यानंतर दोघेही एअरपोर्टच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश करतात. हे दोघे नेमके विमानाने कुठे गेले याची माहिती मिळू शकलेली नाही. पण दोघेही त्यांच्या आगामी सनी कुमारी की तुलसी कुमारी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते गेले असावेत असे सांगितले जात आहे.
हेही वाचा : ‘…पण लग्न नाही, फॅमिली नाही विचार कर’; नेटकऱ्याचा सल्ला अन् जुई गडकरी संतापली





