‘…पण लग्न नाही, फॅमिली नाही विचार कर’; नेटकऱ्याचा सल्ला अन् जुई गडकरी संतापली

Jui Gadkari | अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यातील सायलीच्या पात्रातून जुईने प्रत्येकाच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केले आहे. जुईचा चाहता वर्ग मोठा असून ती नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अशातच आता जुई गडकरीने एका नेटकऱ्याला चांगलंच सुनावले आहे.
जुईने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. चाहत्याने जुईच्या इन्स्टाग्राम इनबॉक्समध्ये मेसेज केला होता. “जुई लग्न कर कोणीही असू दे पण कर…सल्ला आहे कारण वेळ नाही”, असा मेसेज चाहत्याने केला होता. त्यानंतर जुईच्या स्टोरीलाही या चाहत्याने रिप्लाय दिला होता. “टीआरपी कमी होत आहे मॅडम, तुमचं मार्केटिंग कमी पडतंय. मेकअप आणि दिसणं वेगळं असतं. टीव्ही सिरियलमध्ये मॅडम तुम्ही मोठे असाल पण लग्न नाही फॅमिली नाही विचार करा”, असं त्याने म्हटलं होतं. Jui Gadkari |
या चाहत्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत जुईने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. “अशा माणसांची कीव येते. लवकर बरे व्हा…देव तुमचं भलं करो. देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकरात लवकर कमी होवो”, असं जुईने म्हटलं आहे. दरम्यान, जुईप्रमाणे अनेक कलाकरांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र जुईने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच खडसावले आहे. Jui Gadkari |
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई गडकरीला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र काही वर्षांपूर्वी जुई मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने पुन्हा दमदाररित्या कामाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा:
Pregnancy After age of 40: ४० वर्षांनंतरची प्रेग्नन्सी : धोके आणि घ्यावयाची काळजी






