मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याला भेगा पडल्याचे ट्वीट केले. त्या ट्वीटची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हंटले की, पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तात्काळ दखल घेतली जाईल… pic.twitter.com/2Txjdc6hXa
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 19, 2021
या ट्वीटला लगेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामे देखील लवकरात लवकर केली जातील, असे नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.