“मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू” ; पंकजा मुंडे यांची हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात

Pankaja Munde Speech । राज्यात आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भगवान गडावर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. त्यातच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र आले आहेत . दरम्यान , या दसऱ्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी हिंदीतून कविता म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
आजच्या दसरा मेळाव्याची सुरुवात करताना पंकजा मुंडे यांनी “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू” असं म्हणत आपल्या भाषण सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंचावर बसलेल्या प्रत्येक मान्यवरांचा खास उल्लेख करत त्यांचे या दशहरा मेळाव्यात स्वागत केले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख त्यांनी ‘धनूभाऊ’म्हणून केला. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. त्यासोबत या मेळाव्याला त्यांचा मुलगा देखील उपस्थित होता.यावेळी त्यांनी आपल्या मुलापेक्षा आपल्याला ही समोर असणारी जनता प्रिय असल्याचे म्हटले.
यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांची ओळख पंकजा मुंडे यांनी ‘लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू’ अशी करून दिली.तसेच माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही पण त्यांनी सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथ स्वागत करते.असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्यावर ज्यावेळी GST ची रेड पडली तेव्हा या लोकांनी 12 कोटी जमा केले असल्याचे म्हटले .
माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला. इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते. आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता असे त्यांनी समोर असणाऱ्या जनतेला उद्देशून म्हटले.
हेही वाचा
Pankaja Munde Dasara Melava 2024 | लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू





