Pankaja Munde Dasara Melava 2024 | लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू

Pankaja Munde। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावर्षी राज्यात आपल्याला 6 दसरा मेळावे पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी, राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचा राजकीय दसरा मेळावा सुरू केला.
दरम्यान, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली होती. पार्थर्डी तालुक्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास हा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली होती. पार्थर्डी तालुक्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास हा दसरा मेळावा होणार आहे.
-मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, मी कुणालाही घाबरत नाही
-मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू, हिंदीतून कविता म्हणत पंकजा मुंडे यांची भाषणाला सुरुवात
-आपण सर्वजनण संघर्षात एक आहोत- धनंजय मुंडे
या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे
– लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू
– गोपीनाथ मुंडेंचे फोटो हाती घेत समर्थकांची पकंजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला तुफान गर्दी
– धनंजय मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवान गडावर दाखल; महंत नामदेव शास्त्री यांच्या पायावर ठेवलं डोकं
-धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल झाले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरील श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
-मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया





