पंकजा मुंडेंचा पराभव ; कार्यकर्त्यानं संपवलं जीवन, मुंडे धाय मोकलून रडल्या

Pankaja Munde cry । लोकसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत चुरशीच्या निकालात बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. मात्र बीडमधले पंकजा मुंडे यांचे समर्थक गणेश बडे यांना त्यांचा पराभव सहन झाला नाही. त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर पंकजा मुंडे या बीडमधल्या बडे कुटुंबाच्या घरी अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी कुटुंबाचा आक्रोश पाहून त्यांनाही रडू कोसळलं.
मयत कार्यकर्त्यांच्या मुलींची जबाबदारी घेतली Pankaja Munde cry ।
गणेश बडे यांच्या दोन्ही मुलींची जबाबदारी ही आता माझी आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच कुटुंबाचं सांत्वन करताना त्यांना अश्रू अनावर झाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे चिंचेवाडी येथील तरुण पोपटराव वायभासे यांनीही आत्महत्या केली. पोपटराव वायभासे यांनाही पंकजा मुंडेंचा पराभव सहन झाला नाही. गणेश बडे यांच्याप्रमाणेच त्यांनीही त्यांचं आयुष्य संपवलं. पंकजा मुंडेंनी या कुटुंबाचीही भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी पंकजा मुंडे धाय मोकलून रडल्या.
…. तर मी राजकारण सोडून देईन Pankaja Munde cry ।
“ज्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं ते सगळे तरुण होते. त्यांना लहान लेकरं आहेत. माझी विनंती आहे की कुणीही जीव देऊ नये. तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवा असेल तर मलाही हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. यापुढे जर कुणी आत्महत्या केली तर मी राजकारण सोडून देईन. गणेशने अशा प्रकारे पाऊल उचललं. मी आज इथे काय बोलायचं माझ्याकडे शब्दच नाहीत. राजकारणात अनेकदा अनेक ठिकाणी जावं लागतं. आज ही वेळ जी माझ्यावर आली आहे ती कोणत्याही नेत्यावर आली नसेल. बीडमध्ये चार जणांनी जीव दिला आहे. पंकजाताईंचा पराभव सहन होत नाही म्हणून जीव दिला. माझ्यासाठी हे समजण्यापलिकडचं आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीला, भेटीला मी धावून जाते. गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा शपथ घेतली होती की लढेन पण रडणार नाही. मात्र आज माझे अश्रू अनावर झाले. ” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.





