भाजप नेत्या पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट, युवक ताब्यात; आज पाथर्डी बंदची हाक

Pankaja Munde । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची हाक देण्यात आलीय.
पंकजा मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता. संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.
परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल Pankaja Munde ।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. गणेशपार भागातील गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांनी चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले. मतदानापासूनच बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते मात्र मतमोजणीनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहेत.
नेमकं काय घडले? Pankaja Munde ।
मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली. बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानले जाते, या मतदारसंघा धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होत.
बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली.. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट देखील केली.





