जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला पंघल मुकणार
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघल याला येत्या काळात होत असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या पात्रता स्पर्धेत त्याला आपला सहभाग निश्चित करता आला नाही व त्यामुळे त्याला मोसमातील या मोठ्या स्पर्धेत गुणवत्ता सिद्ध करत पॅरिस ऑलिम्पिकचा सरावही करताय येणार नाही.
यंदा ही स्पर्धा येत्या 30 एप्रिलपासून ताश्कंद येथे होणार आहे. गेल्या वेळी झालेल्या या स्पर्धेत त्याने 51 किलो गटात रजतपदक पटकावले होते. अमितला सहभाग निश्चित करता आला नाही त्यामुळे 2019 साली आशियाई स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलेल्या दीपक बोरिया याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. पंघलने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते. मात्र, तरीही त्याला या स्पर्धेपासून दूर राहावे लागणार आहे.





