Pune News : नेहरूंची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक : प्रा. विशाल पतंगे
Pune News : स्वातंत्र्यलढा सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचे संकल्पचित्र रेखाटले होते.

Pune News : स्वातंत्र्यलढा सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे संकल्पचित्र रेखाटले होते. संस्था उभारणी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी अर्थकारण आणि अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण या चार आधारस्तंभांवर आधुनिक भारताची उभारणी झाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेहरू अभ्यासक प्रा. विशाल पतंगे यांनी केले. (Pune News)
राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी संस्थात्मक पायाभरणी केली. आज नेहरूंवर टीका करता येत असली, तरी भारतीयांच्या जीवनातून त्यांचे योगदान वजा करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Pune News)
पंडीत नेहरू जयंतीनिमित्त ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या सिव्हिल सोसायटी, पॉलिसी अँड रिसर्च विभागाच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित भारत भाग्यविधाता’ या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळदादा तिवारी होते. (Pune News)
पतंगे म्हणाले, नेहरूंनी आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांची उभारणी करून देशाच्या विकासाचा पाया रचला. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीने काम केले. (Pune News)
तिवारी म्हणाले, देशाचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अवगत असणे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचविणे ही आजची गरज आहे. यावेळी राजेश मुंढे, प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, हनुमंत पवार आदी उपस्थित होते. जिविका उठडा यांनी आयोजन केले. (Pune News)





