मुंबई – पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना सन 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.
तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.