Pandharpur Temple : विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे होणार संवर्धन; 3 दिवस मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन बंद राहणार
सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे (Pandharpur Temple) संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण देण्यात येणार आहे.

Pandharpur Temple : श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे (Pandharpur Temple) दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली दि. २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांचे मार्फत तसेच मंदिर समिती व सल्लागार परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या संदर्भात पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंदिर समितीची (Pandharpur Temple) १३ सप्टेंबर रोजी सभा संपन्न झाली आहे. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे २२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे यासाठी २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी (मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन) पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे (Pandharpur Temple) संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण देण्यात येणार आहे.
श्रींच्या मूर्तीची जतन व संवर्धनाची जबाबदारी मंदिर समिती अत्यंत गांभीर्याने पार पाडत आहे. मूर्तींच्या संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले आहे. संबंधित सक्षम प्राधिकरणांच्या मान्यता आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मूर्तींच्या प्राचीन स्वरूपाला, पावित्र्याला किंवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत भाविकांच्या श्रद्धेचा नितांत आदर राखून पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल.
– डॉ.विलास वाहणे, सहा. संचालक, पुरातत्व विभाग, पुणे






