Pandharpur By-Election | पंढरपुरात मनसेचा ‘या’ पक्षाला पाठिंबा
Updated On:

पंढपुर – पंढरपुर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तेथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी मनसे तर्फे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
केवळ तोंडी पाठिंबा नव्हे तर मनसेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष प्रचारातही उतरले आहेत. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून त्यामुळे तेथे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजप आणि महविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात ही थेट लढत होत आहे. या दोघांखेरीज अन्य 21 उमेदवार या मतदार संघात आपले नशिब अजावत आहेत.





