धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची कारमध्ये आत्महत्या ; घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली

Panchkula Suicide News । हरियाणातील पंचकुला याठिकाणावरून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीडित कुटुंबातील लोक डेहराडूनचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणातील पंचकुलामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंचकुलाच्या सेक्टर २७ मध्ये सामूहिक आत्महत्येची ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. पंचकुला याठिकाणी सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह बंद अवस्थेत आढळले. पीडित कुटुंबातील लोक डेहराडूनचे रहिवासी होते. कुटुंबातील सदस्य कर्जबाजारी होते आणि आर्थिक संकटाचा सामना करत होते असे सांगितले जात आहे.
#WATCH | Panchkula, Haryana | DCP Panchkula Himadri Kaushik says, “We received information that six people have been brought to Ojas Hospital. When we reached here, we found out that they are all dead. Another person was brought to the Civil Hospital, Sector 6; he has also been… pic.twitter.com/2IjADdk3P5
— ANI (@ANI) May 27, 2025
प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण Panchkula Suicide News ।
पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला माहिती मिळाली की ओजस रुग्णालयात सहा जणांना आणण्यात आले आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की ते सर्व मृत आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीला सेक्टर ६ च्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, त्यालाही मृत घोषित करण्यात आले आहे.
प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. घटना उघडकीस आल्यापासून सर्व तपास अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत.” पंचकुला पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासणीसाठी घटनास्थळावरून नमुने गोळा केले.
कुटुंब हनुमान कथेला उपस्थित राहण्यासाठी आले होते
देहरादूनचे रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर, देहरादूनला परतताना, त्यांनी सामूहिक आत्महत्येचे हे पाऊल उचलले.
घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली Panchkula Suicide News ।
मृतांमध्ये डेहराडून येथील रहिवासी ४२ वर्षीय प्रवीण मित्तल, त्यांचे पालक, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एका मुलासह तीन मुलांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था अमित दहिया यांनीही घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला.





