पाचगणी शहराचा पर्यटनाचा सर्वोच्च सन्मान

सादिक सय्यद
पाचगणी – पाचगणी नगरपालिकेला पर्यटन स्थळाला पर्यटकांना मुलभुत सुविधा देवून शहराच्या सुखसुविधा राखण्यात अग्रस्थानी राहणार शहर म्हणुन पाचगणी शहर पर्यटनात सर्वोच्च जागतिक पर्यटन दिना दिवशी पाचगणी नगरपालिकेला नॅशनल टुरीझम अॅवार्डने दिल्ली येथील विज्ञान भवनात उपराष्ट्रपती जगदीप धानगड यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह पाचगणी नगरपालिकेचे मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांचा सन्मान चिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.
पाचगणी नगरपालिकेला देशातील ब वर्ग पर्यटनस्थळात सर्वोउत्कृष्ट पर्यटन सेवा देण्यात उत्तम शहर म्हणुन सन २०१८-१९ च्या नुसार पाचगणी नगरपालिकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात येणा-या पुरस्कारात पाचगणी नगरपालिकेने सहभाग सन २०१८-१९ ला सहभाग नोंदणी केली होती. तरं केद्रांच्या पर्यटन मंत्रालयाकडून पाचगणी नगरपालिकेचा प्रस्ताव मुख्याअधिकारी गिरीश दपकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रालयाच्या टीमकडुन पाठवलेल्या प्रस्तावानूसार केंद्रीय पथकाने पाचगणी येथे सर्वे देखील पार पाडला.
भारतात स्वच्छ शहर असलेल्या पाचगणी शहरात पर्यटकांना पर्यटनस्थळाच्या मूलभूत सुविधा देण्याकरीता पाचगणी नगरपालिकेने केलेल्या सुविधांना केंद्रबिंदू मानुन पाचगणी शहराला नॅशनल टुरीजम अॅवार्ड ने केंद्राकडून सन्मानीत करण्यात आले आहे.
पाचगणी शहराला मिळालेला सन्मान हा सर्व माजी नगरसेवक व पदाधिका-याच्या एकजुटीचा प्रयत्नानी मिळाला असून नॅशनल टुरीजम अॅवार्ड सर्वसामान्य जनतेच यश असल्याची प्रतिक्रीया मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर यांनी व्यक्त केली. तर माजी नगरसेवक नारायण बिरामणे पाचगणी शहराचा झालेला सन्मान हा पर्यटन हा जगभरात उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या शहरात पर्यटकांना उत्तम सुविधांची संधी देवून त्या विकसीत कर्ण कलासंगच ठेवल्याने आपण हा पुरस्कार मिळवू शकलो अशी प्रतिक्रीया दिली.
तर पाचगणी शहराच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी आज पाचगणी शहराला भारत सरकारच्या माननीय पर्यटन मंत्री यांनी पर्यटन स्थळाच्या उत्कृष्ट नागरी व्यवस्थापनासाठी २०१८-२०१९ पुरस्कार प्रदान केले. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा पाचगणीतील सर्व नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण होता.
आपण सर्व मिळून पाचगणीला प्रथम क्रमांकाचे पर्यटन स्थळ बनवू शकतो ज्यामुळे आपल्या नागरिकांचे उत्पन्न आणि समृद्धी वाढेल. ते साध्य करण्यासाठी सहकार्य करूया अशी प्रतिक्रीया मिळालेल्या नॅशनल टुरीझम अॅवार्डबाबतीत व्यक्त केली.




