“लग्नात यापुढे महिलांना फक्त तीनच सोन्याचे दागिने घालता येणार” ; ‘या’ राज्याच्या पंचायतीचा आदेश, दिले ‘हे’ कारण

Panchayat on gold items। सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढत्या किमतींमुळे उत्तराखंडमधील एका पंचायतीने महिलांनी दागिने घालण्याबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. जौनसर अनुसूचित जमाती क्षेत्रातील एका पंचायतीने जारी केलेल्या या आदेशानुसार महिलांना लग्न आणि इतर समारंभात तीनपेक्षा जास्त दागिने घालण्यास मनाई आहे.
महिलांच्या दागिन्यांबद्दलचा हा नियम कंदाड आणि इद्रोली गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. महिलांना परवानगी असलेल्या तीन दागिन्यांमध्ये कानातले, नाकाची नथ आणि मंगळसूत्र यांचा समावेश आहे. दोन्ही गावांच्या संयुक्त पंचायतीने या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५०,००० रुपये दंड आकारण्याची तरतूदही केली आहे. कंदाड याठिकाणच्या रहिवासी अर्जुन सिंग यांनी या नवीन सामाजिक नियमाचे कारण सोन्याच्या वाढत्या किमती असल्याचे सांगितले. Panchayat on gold items।
अर्जुन सिंग यांनी पुढे बोलताना, “अनेक महिला त्यांच्यावर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी दबाव आणतात. सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे कौटुंबिक संघर्ष निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.” असे म्हटले. तसेच दारू आणि बेसुमार खर्चावर बंदी घालण्याच्या महिलांच्या मागणीबाबत त्यांनी सांगितले की, यावर विचार केला जाईल आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले, परंतु काही मतभेद व्यक्त केले.
जौनसरच्या रहिवासी असणाऱ्या महिलांनी याविषयी बोलताना,”जर समानता आणणे हे उद्दिष्ट असेल तर महिलांना दागिने घालण्यापुरते मर्यादित का ठेवायचे?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी पुरुषांना ब्रँडेड दारू पिण्यावर बंदी घालण्याची बाजूही मांडली. अमला म्हणाल्या की सोने ही एक गुंतवणूक आहे जी कठीण काळात कामी येते. दारू आणि इतर अनावश्यक खर्चाचे काय? Panchayat on gold items।
आणखी एका महिलेने लग्नात महागड्या भेटवस्तूंच्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाल्या की ब्रँडेड दारू आणि चिकन हे सर्व फक्त दिखाव्यासाठी आहे. त्या म्हणाल्या की लग्नात घरगुती दारू दिली जात असली तरी ब्रँडेड दारू आणि महागड्या भेटवस्तूंचा ट्रेंड वाढला आहे. जर आपण खर्च कमी करण्याबद्दल बोलत असू तर दारू आणि मांसावरही बंदी घातली पाहिजे.
या सर्वांबद्दल, स्थानिक भीम सिंग म्हणाले की दागिन्यांबद्दलच्या नियमांचे स्वागत केले पाहिजे, परंतु दारू आणि अनावश्यक खर्चाबाबत महिलांच्या मागण्या देखील वैध आहेत. पंचायतीने याचाही विचार केला पाहिजे. जौनसर प्रदेश अनुसूचित जमातींचे वर्चस्व आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या भागात पंचायतीचे मोठे सामाजिक महत्त्व आहे. जीवनशैलीपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत, परिसरातील लोक पंचायतीचे निर्णय खूप गांभीर्याने घेतात आणि त्यांचे पालन करतात.





