पॅन 2.0 प्रकल्पाला सुरुवात; 18 महिन्यांत नव्या स्वरूपात पॅन कार्ड उपलब्ध होणार

नवी दिल्ली – पॅन कार्डाच्या आधुनिकीकरणासाठी म्हणजे पॅन 2.0 प्रकल्पासाठी प्राप्तिकर विभागाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एलटीआय माइंडट्री या कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पाचे कामकाज पूर्ण होऊन नव्या स्वरूपातील पॅन कार्ड 18 महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आहे त्या पॅन कार्डमध्ये सुधारणा करणे आणि त्यामध्ये नव्या मूल्यवर्धित बाबी समाविष्ट करणे इत्यादीचा या प्रकल्पात समावेश आहे. पॅनमधील अपडेट, दुरुस्ती, आधार- पॅन लिंकिंग, आधारचे फेरवाटप, इत्यादी बाबीचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
माईंडट्री कंपनी सेवा पुरवठादार म्हणून काम करणार आहे.
यात पॅनचे डिझाईन, विकास, अंमलबजावणी, देखभाल इत्यादीचा समावेश आहे. प्राप्तेकर विभागाच्या याविषयीच्या 1,435 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी परवानगी दिली आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सध्या ज्यांच्याकडे पॅनकार्ड आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज पडणार नाही.

