पिंपरी | चिखलीतील जीआयएस स्कूलमध्ये पालखीचा सोहळा उत्साहात साजरा

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – एस एस पी ग्रुप ऑफ़ इन्स्टिटयूटच्या चिखलीतील जीआयएस प्ले स्कूल व जीआयएस सीनिअर सेकंडरी विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. शाळेच्या प्रांगणात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. संतांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे वातावरण विठ्ठलमय झाले होते.
टाळ- मृदंगाच्या गजरात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी फेर धरत व ‘ज्ञानोबा माऊलीं’ चा जयघोष करत वारीने प्रस्थान ठेवलेे. या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे सदस्य स्नेहल पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड, प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गडद तसेच मान्यवरांनी केले.
शिक्षक वासुदेव शेवाळे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. शाळेच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पांडुरंगाष्टकम पठण केले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘खेळ मांडियेला’ हा अभंग व ‘माझे विठ्ठल पंढरी’ भजन सादर केले. यावेळी दिपक महाराज शिंदे यांची व शिक्षिका सोनाली जाधव यांची कीर्तनसेवा झाली. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या भक्तीगीतावर आधारित ‘गुरु नामाचा गजर’ हे नृत्य व नाटिका सादर केलीश्री विठूरायाच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, संस्थेचे सदस्य स्नेहल पाटील, चक्रवर्ती माडीवाल, सचिव चंद्रशेखर पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, उपमुख्याध्यापिका प्रीती खंडेलवाल, विजयालक्ष्मी हाके, पर्यवेक्षिका माधुरी येवले व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.




