Palghar News : मोठी दुर्घटना ! पालघरमध्ये कंपनीत भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील (Palghar News) पाली पोशेरी येथील कंपनीत भिंत कोसळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Palghar News : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील (Palghar News) पाली पोशेरी येथील कंपनीत भिंत कोसळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना टीना रबर कारखान्यात घडली असून मृतांमध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. केशव गुणगुणा, रंजना कोंब आणि मीरा गवळी अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
या घटनेनंतर (Palghar News) वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाल असून संबंधित घटनेचा तपास करत आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे, पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमधील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने कंपनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील वैरागमध्येही दोन दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली. घराची भिंत कोसळून (Palghar News) मावशी-भाचीचा मृत्यू झाला आहे. वैरागमधील खेंदाड गल्लीमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मीनल गुलाब ठोंबरे आणि त्यांच्या मावशी सुमन महादेव पारदे या दोघी एका खोलीत झोपल्या असताना अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.






