अपक्ष उमेदवार अमित घोडा 24 तासांपासून नॉट रिचेबल ; दोन दिवसांपूर्वीच हितेंद्र ठाकूरांची भेट

Palghar Amit Ghoda । राज्यात विधानसभा पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून जोरदार प्रचार सुरु होणार आहे. असे असताना पालघर जिल्ह्यात वेगळ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप नेते माजी आमदार अमित घोडा यांना महायुतीकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच अमित घोडा मागील 24 तासांपासून बेपत्ता झाली आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
भाजपला बंडखोरी रोखण्यात यश ? Palghar Amit Ghoda ।
अमित घोडा हे मागील शिवसेनेचे आमदार असून 2019 मध्ये उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याने अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळणार का?, हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे.
श्रीनिवास वनगाही होते नॉट रिचेबल Palghar Amit Ghoda ।
पालघरचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न दिल्याने ते देखील नाराज होते. श्रीनिवास वनगा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तब्बल 4 दिवस श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल होते. जवळपास 100 तासांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले होते. घरी पुन्हा आल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या चेहऱ्यावर नाराजी, राग, दुःख दिसून येत आहे. चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





