Big Accident : दुभाजक ओलांडून कार विरूद्ध दिशेला गेल्याने भीषण अपघात; कारमध्ये अडकून एकाचा मृत्यू
Updated On:

पालघर – दुभाजक ओलांडून कार विरूद्ध दिशेला गेल्याने दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (ता.15) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला असून यात एका कारचालकाचा मृत्यू झाला आहे. शोभीत कुमार दास (वय-41) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील मनोर जवळील दुर्वेस गावाच्या हद्दीत गुजरात बाजूने मुंबईकडे भरधाव वेगाने येणारी कार दुभाजक ओलांडून अचानक विरूद्ध दिशेला गेली.
या कारने गुजरातकडे जाणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. या अपघातात समोरच्या कारचा चक्काचूर झाला असून कारमध्ये अडकून कार चालकाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना मनोरच्या ग्रामीण रूग्णलयात प्राथिमक उपचानंतर अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.





