‘पालक’ ते मालक! नेत्यांसाठी पालकमंत्रिपद का असतं महत्त्वाचं? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Maharashtra Political | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. काही जिल्ह्यांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले आहेत. काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. एकीकडे पालकमंत्री पदावरून चर्चा सुरु असतानाच त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे पद आपल्याकडेच राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री पदाचे महत्त्व काय ?
पालकमंत्री पद हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिले जाते. दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्रिपदावरील व्यक्तीची असते. राज्यात पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तसेच एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो. राज्यांच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यासाठी निधीची तरतूद असते, त्याबाबत पालकमंत्र्यांची भूमिका निर्णायक असते. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही, हे पाहणे देखील पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. Maharashtra Political |
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालकमंत्री समन्वयाची भूमिका पार पाडतात. जिल्ह्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्येही पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. सरकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता पालकमंत्री लक्ष ठेवतात. सरकारी योजनांचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. Maharashtra Political |
राजकीयदृष्ट्या वाढलं वजन
जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाची किंवा आघाडीचे सरकार असल्यास पक्षाची आणि स्वत:ची ताकद वाढण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. सरकारी यंत्रणा हाती असल्याने राजकीयदृष्ट्या प्रभावी असतात.जिल्ह्यातील विकासकामांवर देखरेख आणि जिल्हा नियोजन समितीकडील निधीचे वाटप हे पालकमंत्रिदाच्या अधिकारात येते. त्यामुळे त्या विशिष्ट जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरील व्यक्तीला राजकीय दृष्ट्या वजन मिळते. शासकीय आणि राजकीयदृष्ट्या हे पद महत्त्वाचे मानले जाते. Maharashtra Political |
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने जिल्ह्यातील सरकारी निधीवर पालकमंत्र्यांचे वर्चस्व असते. जिल्ह्यातील विकास कामासाठी निधीचे नियोजन करणे हे जिल्हा नियोजन समितीकडून निश्चित केले जाते. सरकारी योजनांची अंमलबजावणी, नैसर्गिक आपत्ती आल्यास लोकांना मदत, दुष्काळी परिस्थिती यावर लक्ष द्यावे लागते. यासाठी पालकमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला दौरे करावे लागतात. सर्व गोष्टींची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी केली जाते का याकडे पालकमंत्र्यांना लक्ष द्यावे लागते.
पालकमंत्रीपद कधीपासून नेमले जाऊ लागले ?
राज्यघटना किंवा सरकारच्या कामकाजाच्या नियमात पालकमंत्रीपदाची तरतूद नाही. पालकमंत्रीपद हे प्रथम महाराष्ट्रात अस्तित्वात आले. वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी असताना 1972 नंतर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे ही पद्धत तशीच सुरु राहिली. Maharashtra Political |
याच दरम्यान 74 व्या घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समिती असली पाहिजे अशी तरतूद करण्यात आली. या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नेमला जातो. तेव्हापासून पालकमंत्रिपद अस्तित्वात आले. जिल्हाधिकाऱ्यांसह सचिव सदस्य, लोकप्रतिनिधी हे या नियोजन समितीचे सदस्य असतात. Maharashtra Political |
पालकमंत्री पदावरून वाद का ?
रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच आहे. तर मुंबई व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे. काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरू होते. महायुती सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातच पालकमंत्री पदाची संभाव्य यादी देखील समोर आली आहे. Maharashtra Political |
पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी –
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचाही दावा
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचाही दावा
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
गोंदिया – अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – भाजपाकडे राहिल
नंदुरबार – भाजपाचा दावा
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजनांचाही दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
हेही वाचा:
प्रशांत किशोर उपोषणावर ठाम ! म्हणाले,”आता हे प्रकरण गांधी मैदानावरच निकाली काढणार”





