Women’s T20 World Cup 2024 : पाकिस्तानची विजयी सलामी, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा सहज केला पराभव…

Women’s T20 World Cup 2024 (PAK Vs SL) : महिला टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे पाकिस्तानने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. याआधीच्या सामन्यात बांगलादेशने स्कॉटलंडचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात 116 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 85 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानसाठी अष्टपैलू कामगिरी करणारी कर्णधार फातिमा सना ही सामन्याची मानकरी ठरली.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात सर्वबाद 116 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कर्णधार फातिमा सनाने 20 चेंडूत 30 धावांची सर्वोच्च खेळी केली तर ओमामा सोहेलने 19 चेंडूत 18 धावा केल्या. याशिवाय निदा दारने 22 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधिनीशिवाय सुगंधिका कुमारी आणि चामरी अटापट्टू यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. याशिवाय कविशा दिल्हारीला 1 यश मिळाले.
We are off to a winning start in the ICC Women’s #T20WorldCup! 🙌
A tremendous bowling performance as Pakistan triumph by 31 runs ✨#PAKWvSLW | #BackOurGirls pic.twitter.com/S1BUEAquuw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 3, 2024
प्रत्युत्तरात श्रीलंकेने पाकिस्तानला 20 षटकात 85 धावसंख्येवरच रोखले. श्रीलंकेसाठी निलाक्षी डी सिल्वाने 25 चेंडूत सर्वाधिक 22 धावा केल्या. सलामीवीर विश्मी गुणरत्नेने 34 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार चमारी अटापट्टू 9 चेंडूत 6 धावा करून बाद झाली. चामारी अटापट्टूसह इतर फलंदाजांनी निराशा केली. श्रीलंकेच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेशची विजयी सलामी, स्कॉटलंडचा 16 धावांनी केला पराभव…
पाकिस्तानकडून गोलंदाजीत सादिया इकबाल हिने 4 षटकात 17 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर कर्णधार फातिमा सना, नशरा संधू आणि उमैमा सोहेल यांनी 2 विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.





