#PAKvAUS 1st Test Day 3 : पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाचे दमदार प्रत्युत्तर
Updated On:

रावळपिंडी – प्रमुख फलंदाजांनी केलेल्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 2 बाद 271 धावा करत चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने आपला पहिला डाव 4 बाद 476 धावांवर घोषित केला होता. त्यात अझर अली (185) व इमाम उल हक (157) यांनी दमदार दीडशतकी खेळी केली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाचा खेळ अंधूक प्रकाशामुळे लवकर थांबवण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियानेही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सलामीवीर उस्मान ख्वाजा याला शतक पूर्ण करण्यात अपयश आले. तो 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही 68 धावांवर परतला. खेळ थांबला तेव्हा मार्नस लेबुशेन 69 तर स्टिव्हन स्मिथ 24 धावांवर खेळत आहेत. या सामन्याचे आता केवळ दोन दिवस बाकी असून, हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता वाढली आहे.





