Prakash Ambedkar : पाकचे पाणी बंद केले नाही, सरकार जनतेची दिशाभूल करत आहे; प्रकाश आंबेडकर यांची टीका

शिर्डी : भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केलेले नाही, सरकार खोटं बोलत असून देशातील नागरिकांची दिशाभूल करत आहे. 24 एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेले पत्रच त्यांनी दाखवले. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातील पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे त्यांनी म्हटले.
माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करत आहे, हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा भुसार रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले.
सिंधू जल कराराबाबत आंबेडकर म्हणाले, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो करार रद्द केला तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप अॅक्शन घ्या ना. जे समोर आले त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला १० वर्षे लागतील, असेही त्यांनी म्हटले.





