पाकिस्तानचा नवा कांगावा; म्हणे कुलभूषण जाधव यांच्यासाठी भारताने वकील दिला नाही

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या फेरविचार याचिकेवरील सुनावणीसाठी भारताने वकील दिला नाही, अशी माहिती पाकिस्तानी न्यायालयात देण्यात आली.
जाधव यांच्या सुटकेसाठी भारतीय वकील नेमण्याची किंवा नि:पक्ष सुनावणीसाठी क्विन्स कौन्सिलची नेमणूक करण्याची भारताची मागणी फेटाळली. त्यानंतर पाकिस्तानची ही सबब पुढे आली आहे. माजी नौदल अधिकारी असणाऱ्या जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली आहे. जाधव यांना वकील देण्यासाठी इस्लामाबाद न्यायालयाने भारताला नवी मुदत गेल्या महिन्यात दिली होती.
जाधव यांच्या वतीने काम पाहण्यसाठी वकील नेमावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी भारत सरकारने त्यांच्यासाठी सहा ऑक्टोबरपर्यंत वकील नेमला नाही. त्याबाबत भारत सरकारला दोन वेळा कळवण्यात आल्याची माहिती इस्लामाबाद न्यायालयात देण्यात आली. मुख्य न्यायाधीश अथर मिनलाह यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे.
जर न्यायलयाने जाधव यांना वकील दिला तर त्याचे परिणाम काय होतील, अशी विचारणा पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल खलीद जावेद खान यांच्याकडे मीनलाह यांनी केली. त्यानंतर ही सुनावणी 9 नोव्हेंबरपर्यंत थांबवण्यात आली.





