पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नाकारले, हाफिज सईदच्या लेकाचा दारुण पराभव

Pakistan : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येत आहे. पीटीआय समर्थित आझाद आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात निकराची लढत आहे. दहशतवादी हाफिज सईदमुळे भारतीयांनाही या निवडणुकीत उत्सुकता आहे. सईदचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
कोण आहे तल्हा सईद?
तल्हा सईद हा लष्कर-ए-तैयबाचा नंबर दोन मानला जातो. हाफिज सईदनंतर त्याचे संपूर्ण दहशतवादी साम्राज्य तल्हा सईदकडे आहे. भारत सरकारने तल्हाला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. भारतातील लष्कर-ए-तैयबाच्या हल्ल्यामागे तल्हा सईदचा हात होता, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
लष्कर-ए-तैयबासाठी भरती आणि निधी उभारणीतही तल्हाचे नाव पुढे आले आहे. तसेच, तो भारताविरुद्ध हल्ल्याचा कट रचत असल्याचे समजते. तल्हावर अनेकवेळा हल्ले झाले मात्र तो फरार झाला.
पाकिस्तानच्या निवडणुकीत तल्हा लाहोरच्या त्या जागेवरून उमेदवारी दाखल केली होती जिथून पीटीआय नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर अटक आणि एकापाठोपाठ तीन खटल्यांमध्ये शिक्षा झाल्यामुळे त्याला निवडणूक लढवता आली नाही.





