पाकिस्तानात हिंदूंनी लाहोरमधील कृष्ण मंदिरात साजरी केली होळी
Updated On:

लाहोर – लाहोरमधील कृष्ण मंदिरात कडक सुरक्षेत पाकिस्तानी हिंदूंनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांची काळजी घेणाऱ्या इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) कडून गुरुवारी होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण मंदिर रंगीबेरंगी रोषणाईने सजवण्यात आले होते.
मंदिर परिसरात उत्सवाचे वातावरण होते. यावेळी केक कापण्यात आला तसेच पाहुण्यांना पारंपारिक मिठाई प्रसादस्वरूपात वाटण्यात आली. महिलांनी विविध गाण्यांवर नृत्य करताना एकमेकांवर रंग लावले. ईटीपीबीचे अतिरिक्त सचिव सैफुल्ला खोखर म्हणाले की, इतर मंदिरांमध्येही विशेष प्रार्थना आणि होळी साजरी करण्यात आली.





