इस्लामाबाद – पाकिस्तानातील “पीएमएल-एन’ सरकारला आपली हत्या करायची आहे, असा दावा माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी केला आहे. सरकार आपल्या हत्येचा कट सरकारकडून केला जातो आहे. 1996 साली जेंव्हा बेनझीर भुट्टो पंतप्रधान होत्या, तेंव्हा त्यांचे बंधू मुर्तझा भुट्टो यांची जशी हत्या करण्यात आली होती, तशीच आपलीही हत्या करण्याचा कट केला जातो आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये इम्रान खान यांनी हा सनसनाटी पसरवणारा दावा केला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पंजाब प्रांतात इम्रान खान यांच्या निषेध मोर्च्यावर जमावातून गोळीबार झाला होता. त्यात ते बचावले होते. मात्र त्यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली होती. आता तशाच प्रकारचा हत्येचा आणखीन एक कट केला जातो आहे, असे म्रिान खान यांनी म्हटले आहे.
न्यायपालिका, इस्लामाबाद आणि पंजाब पोलिसांच्यावतीने हा कट केला जातो आहे. इस्लामाबाद पोलीस आणि त्यांचे हस्तक झमान पार्कच्या बाहेर आपल्यावर हल्ला करण्याचा कट करत आहेत. त्यांनी दोन वेगळी पथके तयार केली आहेत. ही पथके जमावामध्ये मिसळून 4 ते 5 पोलिस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करणार आहेत. त्यानंतर मोजलेल्या गदारोळामध्ये आपल्यावर हल्ला केला जाणार आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
Pakistan Terror Attack : ‘आयएसआय’चे ब्रिगेडियर दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीमध्ये ठार
मुर्तझा भुट्टो यांच्या हत्येसारखी स्थिती निर्माण केली जाणार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. बेनझीर भुट्टो यांचे बंधू मुर्तझा भुट्टो 1996 मध्ये कराचीत पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले होते.