Pakistan: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; व्हॅनवर गोळीबार, 33 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Updated On:

Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील लोअर कुर्रम भागात गुरुवारी संध्याकाळी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये किमान 33 लोक ठार झाले आणि सुमारे 30 लोक जखमी झाले. तहसील मुख्यालय (THQ) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अलीझाई यांनी सांगितले की, जखमींना जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काहींना पेशावरला पाठवले जात आहे.
खैबर पख्तुनख्वाचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी हल्ल्याची पुष्टी केली, ते म्हणाले की बंदुकधारींनी कुर्रममधील पाराचिनार येथे प्रवासी व्हॅनला लक्ष्य केले.
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मृतांप्रती शोक व्यक्त केला. “निरपराध प्रवाशांवर हल्ला करणे हे भ्याड आणि अमानवी कृत्य आहे,” असे पीपीपीच्या मीडिया सेलने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.





