पाकिस्तानातील कारवाईत पाकिस्तान तालिबानचा दहशतवादी ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवाद ठार झाला. उत्तर वझिरीस्तान प्रांतात ही कारवाई झाली, असे पाकिस्तानच्या सैन्याच्यावतीने आज सांगण्यात आले.

 वझिरीस्तानमध्ये फ्रॉन्टियर वर्क्‍स ऑर्गनायजेशन या एका स्वयंसेवी संघटनेच्या चार महिला कार्यकर्त्यांच्या हत्येमध्ये सहभाही असलेला दहशतवादी सफिोउल्लाह हा या चकमकीत मारला गेला. सुरा दलांवरील हल्ल्यासाठी “आयइडी’ तयार करण्याचे कामही तो करत होता. अपहरण आणि खंडणीचेही गुन्हे त्याच्यावर दाखल होते, असे इंटर स्टेट पब्लिक रिलेशन्सने म्हटले आहे. आजच्या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना स्फोटके आणि दारुगोळ्याचा मोठा साठा सापडला आहे.

दक्षिण वझिरीस्तान आणि उत्र वझिरीस्तान हे पूर्वीचे अर्ध स्वायत्त आदिवासी भूभाग असून “फोटा’ या नावाने हा भाग ओळखला जातो. पाकिस्तानातील तसेच विदेशातील अनेक दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान याच भागात आहे. पाकिस्तानने या बागात सतत कारवाई केल्यामुळे या भागातील दहशतवाद्यांनी शेजारील अफगाणिस्तानमध्ये पळ काढला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.