‘पाकिस्तानने PoK रिकामा करावा, आमच्या धोरणात बदल नाही’, परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले ते जाणून घ्या

नवी दिल्ली – पाकिस्तानने बेकायदा बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर (PoK) रिकामा करावा, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान तणावावर भारताची भूमिका मांडली. जम्मू-काश्मीरचा मुद्दा फक्त भारत आणि पाकिस्तानद्वारा द्विपक्षीय मार्गाने सोडवला जाईल, यात तिसऱ्या पक्षाची भूमिका नसेल, असे त्यांनी ठणकावले.
#WATCH | MEA spokesperson Randhir Jaiswal says, “We (India) welcome the direct talks that have been announced between Russia and Ukraine. Talks present an opportunity for both parties to address their concerns through dialogue and diplomacy. India has consistently advocated the… pic.twitter.com/k5OryjRmVx
— ANI (@ANI) May 13, 2025
जायसवाल यांनी सांगितले की, PoK रिकामे करण्याचे भारताचे धोरण कायम आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. तसेच, केंद्रीय सुरक्षा समितीच्या निर्णयानुसार, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे विश्वासार्ह आणि कायमस्वरूपी थांबवल्याशिवाय सिंधू जल करार स्थगित राहील. सिंधू जल करार सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने झाला होता, परंतु पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या तत्त्वांचा भंग केला आहे.
#WATCH | Delhi: On UNSCR 1267 Sanctions Committee, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “Over the last two years or so, we have been sharing information with the United Nations Security Council and the monitoring team of the Sanctions Committee as to why the terrorist The… pic.twitter.com/LhaRpehQKz
— ANI (@ANI) May 13, 2025
पाकिस्तानच्या वक्तव्यांवर जायसवाल म्हणाले, “ज्या देशाने औद्योगिक स्तरावर दहशतवादाला चालना दिली, तो परिणामांपासून वाचेल असे समजणे म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. पाकिस्तानने हे लवकर समजावे.” ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’पासून १० मेपर्यंत भारत-अमेरिका नेत्यांमध्ये सैन्य परिस्थितीवर चर्चा झाली, परंतु व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Delhi: On a question of India and Pakistan ‘hyphenation’, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “…We believe that it is quite the reverse. There is widespread understanding in the world that Indian tourists were the victims of terrorism at Pahalgam and that the… pic.twitter.com/uQnaN51SNz
— ANI (@ANI) May 13, 2025





