पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची भारताला अणुबॉम्बची धमकी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत बरळल्यानंतर आता पाकिस्तानातील एका महिला मंत्र्याने भारतला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. शाजीय मर्रि ( Shazia Murri ) असे त्यांचे नाव असून आमचे न्यूक्लिअर स्टेटस शांत बसण्यासाठी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किचन तेलंगणात तर बेडरुम महाराष्ट्रात! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर आहे अनोखे घर
बिलावल भुट्टो यांच्या समर्थनासाठी मर्रि यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भारतासोबत युध्दाची भाषा केली असून विष ओकले आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की भारताबाबत आम्ही तक्रार करत नसून त्या देशात जे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. ते जर पुन्हा पुन्हा पाकिस्तानवर आरोप करत असतील आणि पाकिस्तान गप्प बसेल असे त्यांचे मानणे असेल तर हे होणार नाही.
बिलावल भुट्टो यांचे पुतळे जाळण्याची ते धमकी देत आहेत. मात्र त्यांचे स्वत:चेच पुतळे त्यांच्या देशातच जाळले जात आहेत. त्यामुळे त्यांनी सुधारणा करावी. मोदी सरकार लढणार असेल तर त्यांना उत्तर दिले जाईल. आम्हाला अण्वस्त्रसंपन्न राष्ट्राचा दर्जा मिळाला आहे तो काही गप्प बसण्यासाठी मिळालेला नाही. उत्तर कसे द्यायचे ते आम्हाला ठाऊक आहे.





