पाकच्या नफीसाने बनारसच्या तुफैलला हनी ट्रॅपमध्ये अडकवले ; मग सुरू झाला हेरगिरीचा खेळ

Pakistan Espionage । पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वाराणसीच्या मोहम्मदला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर आता तुफैलबद्दल धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता समोर आलेल्या माहितीवरून, तुफैलला हनी ट्रॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या जाळ्यात कसे ओढले गेले आणि त्याचा वापर भारताविरुद्ध कसा सुरू झाला” याविषयीची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या तपासातून तुफैल सोशल मीडियाद्वारे नफीसा या पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला होता. नफीसाचा नवरा पाकिस्तानी सैन्यात सेवा बजावतो. ही नफीसा हळूहळू तुफैलला व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक आणि इतर माध्यमांद्वारे भारताबद्दल संवेदनशील माहिती गोळा करण्यास भाग पाडत होती. तसेच तुफैल पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकला होता आणि विचार न करता भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता.”अशी माहिती समोर आली आहे.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये रस वाढला, धर्मगुरूंशी जवळचा संपर्क Pakistan Espionage ।
तुफैलबद्दल, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी,”तो खूप धार्मिक स्वभावाचा होता. ते नियमितपणे उर्स, जलसा आणि व्याख्यानांमध्ये सहभागी होत असत. तो सतत मौलवी आणि मौलानांच्या संपर्कात होता. ” अशी माहिती दिली. त्याच्या मामाचा मुलगा मोहम्मद शकलीनने त्याच्याविषयी बोलताना,”२०१४ मध्ये त्याच्या पालकांचा घटस्फोट झाल्यानंतर, तुफैल त्याच्या आईसोबत आदमपूर पोलिस स्टेशनच्या हनुमान फाटक येथील नवापुरा येथे त्याच्या आजीच्या घरी राहू लागला. त्याची आई जाहिदा बीबीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी तिला भेटण्यास नकार दिला.”अशी माहिती दिली.
शकलीनने सांगितले की, “तुफैल तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. वडील मकसूद आलम जैतपुरा येथील दोशीपुरा याठिकाणी राहतात, परंतु घटस्फोटानंतर त्यांचे त्यांच्या मुलांशी आणि पत्नीशी कोणतेही संबंध राहिले नाहीत. शिक्षण सोडल्यानंतर तुफैलने विणकाम सुरू केले. जेव्हा यामध्ये मंदी आली तेव्हा त्याने पीव्हीसीचे काम करायला सुरुवात केली, जे तो आतापर्यंत करत होता. शकलीन म्हणाला, “तुफैलचा नियमित दिनक्रम नव्हता आणि तो रात्री उशिरापर्यंत बाहेर असायचा”
‘गजवा-ए-हिंद’ आणि ‘शरिया’ अंमलबजावणीचे संदेशाचे शेअरिंग Pakistan Espionage ।
एटीएसच्या तपासात असे दिसून आले की तुफैल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा नेता मौलाना शाद रिझवी यांचे व्हिडिओ आणि संदेश व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करत असे. त्यांनी ‘गजवा-ए-हिंद’, बाबरी मशिदीचा बदला आणि भारतात शरिया लागू करणे यासारखे कट्टरपंथी संदेशही प्रसारित केले. त्याने राजघाट, नमोघाट, ज्ञानवापी, रेल्वे स्टेशन, जामा मशीद, लाल किल्ला, निजामुद्दीन औलिया इत्यादी भारतातील अनेक संवेदनशील आणि धार्मिक स्थळांचे फोटो आणि माहिती पाकिस्तानी नंबरवर शेअर केल्याचा आरोप आहे. त्याने पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या गटांच्या लिंक्स वाराणसीतील अनेक लोकांना पाठवल्या होत्या आणि ६०० हून अधिक पाकिस्तानी नंबरशी संपर्कात होता हे देखील समोर आले.
तुफैल एटीएसकडून अटक
उत्तर प्रदेश एटीएसला गुप्तचर माहिती मिळाली होती की वाराणसीमध्ये राहणारा एक व्यक्ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत आहे. यावर एटीएस वाराणसी युनिटने तपास सुरू केला, ज्यामध्ये असे आढळून आले की आरोपी तुफैल हा पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या लोकांशी थेट संपर्कात आहे. सखोल चौकशीनंतर, २२ मे रोजी तुफैलला एटीएस लखनऊने वाराणसीच्या आदमपूर भागातून अटक केली. त्याच्याविरुद्ध लखनऊ येथील एटीएस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नफीसाची भूमिका महत्त्वाची
तुफैलच्या अटकेनंतर उघडकीस आलेला सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे पाकिस्तानी महिला नफीसाची भूमिका. तुफैल फेसबुकद्वारे नफीसाच्या संपर्कात आला. नफीसाने भावनिक आणि धार्मिक संभाषणांद्वारे तुफैलला तिच्या जाळ्यात अडकवले. तिचा नवरा पाकिस्तानी सैन्यात आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की हे वैयक्तिक संभाषण नव्हते तर एक धोरणात्मक हनी ट्रॅप होते.





