दुबई :- आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी खास अडीच महिन्यांची विंडो देण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जोरदार टीका केली आहे. आयपीएल ही आयसीसीची नव्हे तर बीसीसीआयची लीग असूनही आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात त्यासाठी खास तरतूद करणे अन्य देशांच्या द्विपक्षिय मालिकांवरचा अन्याय असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमिझ राजा यांनी व्यक्त केले आहे.
2024 सालापासून आयसीसी या लीगसाठी विंडो देणार असल्याने अनेक देशांच्या वेळापत्रकात अनेक खेळाडूंना केवळ विश्रांती घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. राजकीय तणावामुळे बीसीसीआयने पाकच्या क्रिकेटपटूंवर या स्पर्धेसाठी बंदी घातली असल्यानेच राजा यांनी टीका केल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.