उमर अकमल करणार पुनरागमन
Updated On:

लाहोर – पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलला क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्यामुळे आता त्याला स्थानिक क्रिकेटसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करणे शक्य होणार आहे.
भ्रष्टाचाराची माहिती लपवल्याबद्दल अकमलने मंडळाची माफी मागितली होती. मात्र, त्याने ही माहिती लपवल्यामुळे त्याच्यावर मंडळाने तीन वर्षांची बंदी घातली होती. अर्थात ही बंदी कमीदेखील करण्यात आली होती.





