Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
Updated On:

Pakistan Attack – केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त २ डझन कंपन्या म्हणजे २ हजार ४०० जवान जम्मू-काश्मीरला रवाना होणार आहेत.
सीमाभागातील सुरक्षा आणखी मजबूत करण्यास ते भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) मदत करतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी विशेष आदेश जारी केला आहे.
त्यानुसार, जवानांच्या रजा रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तान समवेतचा तणाव वाढल्याने संबंधित दलांचे अधिकाधिक जवान तैनातीसाठी उपलब्ध राहतील याची निश्चिती केली जात आहे.
सीआरपीएफने बदल्या आणि पोस्टिंगशी संबंधित सर्व आदेश तूर्तास स्थगित केले आहेत. त्याशिवाय, प्रशिक्षण कार्यक्रमही लांबणीवर टाकले आहेत.





