कर्तारपुरच्या भाविकांना पाकिस्तानची अनुमती

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने कर्तारपुर येथील गुरूद्वारा दरबार साहिब येथे भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांना पुढील महिन्यापासून तेथे जाण्याची अनुमती दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या गुरूद्वाराची भेट बंद करण्यात आली होती.
कर्तारपुर गुरूद्वारा खुला करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने शनिवारी घेतला होता. शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक देव यांची जयंती 22 सप्टेंबर रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण पुर्ण झालेल्या नागरीकांनाच तेथे अनुमती दिली जाणार आहे असेही पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच त्यांना 72 तासांच्या आत घेण्यात आलेल्या आयटीपीसीआर चाचणीचीही सक्ती करण्यात आली आहे. गुरूद्वारात एकाच वेळी तिनशे पेक्षा जास्त भाविकांची गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेण्याची त्यांना सुचना करण्यात आली आहे.





