Balochistan Terror Incidents : बलुचिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यात 6 पोलीस ठार तर 17 जण जखमी

इस्लामाबाद – बलुचिस्तानात आज दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये किमान 6 पोलीस ठार झाले आणि 17 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या 7 बॉम्बस्फोटातील 2 स्फोट क्वेट्टा शहरात, 1 कोहलू जिल्ह्यातील कहान भागात, चौथा स्फोट तुरबत भागात झाला.
“इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन’ने दिलेल्या माहितीनुसार कोहलू जिल्ह्यातील कहान भागात एका आघाडीच्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाजवळ “आयईडी’चा स्फोट झाला. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या परिसरात 24 डिसेंबरपासून शोध मोहिम केली जात आहे. त्या दरम्यान हा स्फोट झाला.
रविवारी बरुचिस्तानमध्ये 5 ठिकाणी ग्रेनेड हल्ले झाले. त्यात 15 जण जखमी झाले होते. कहान भागातील शोधमोहिमेदरम्यान झालेल्या स्फोटात पाक लष्कराचे 5 सैनिक मारले गेले होते. याशिवाय क्वेट्टा शहरात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 4 जण जखमी झाले. तर झोप जिल्ह्यातील सांबाझा भागात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान एक दहशतवादी आणि एक सैनिक मारला गेला. तर दोन सैनिक जखमी झाले होते.
#RussiaUkraineWar : युक्रेनचे ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा; ड्रोनमुळे हवाई तळावरील…
पाकिस्तानात तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने युद्धबंदी जुगारून दिल्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.





