PAK vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटींसाठी पाकचा संघ जाहीर, PCB ने ‘या’ 3 दिग्गजांना दाखवला घरचा रस्ता…

PAK vs ENG 2nd & 3rd Test : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्थापन केलेल्या नव्या निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझमला दोन्ही कसोटीतून वगळण्यात आले आहे तर कर्णधार शान मसूद सध्या कर्णधारपद वाचवण्यात यशस्वी ठरला आहे.
या’ 2 दिग्गजांनाही मिळाला डच्चू….
केवळ बाबर आझमच नाही तर शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमद यांनाही शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी घोषित संघातून वगळण्यात आले आहे. सरफराज अहमद पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता पण बाबर, शाहीन आणि नसीम यांची पहिल्या कसोटीतील कामगिरी अतिशय सामान्य होती. याच कारणामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले आहे.
‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी…
पाकिस्तानच्या कसोटी संघात कामरान गुलाम, मेहरान मुमताज या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रिझवानसोबत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून हसीबुल्लाहला संधी देण्यात आली आहे, तर खराब फॉर्म असूनही सैम अयुबलाही आणखी एक संधी देण्यात आली आहे.
पाकचा पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव…
मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही एक डाव आणि 47 धावांनी पराभूत झालेला पाकिस्तान पहिला संघ ठरला. या कसोटीत पाकिस्तानची दोन्ही डावात गोलंदाजी अतिशय सामान्य होती तर दुसऱ्या डावात फलंदाजी निराशाजनक होती.
Pakistan name squad for 2nd and 3rd England Tests
Details here ➡️ https://t.co/vWp6IJeDkj#PAKvENG | #TestAtHome
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 13, 2024
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ पुढीलप्रमाणे : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
IND vs BAN 3rd T20 : भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 3-0 ने घातली खिशात…
शेवटच्या 2 कसोटींचे वेळापत्रक…
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुलतान येथे खेळवला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना रावळपिंडीत 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे.





