“पाणी बंद केल्यास युद्ध, १३० अण्वस्त्रे भारतासाठी तयार” ; पाक रेल्वेमंत्र्यांची थेट धमकी

Pahalgam Terror Attack । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्यानंतर शेजारील देश घाबरला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेटधमकी दिली आहे. ही धमकी देताना त्यांनी, “जर भारताने आमचे पाणी बंद केले तर युद्धासाठी तयार राहा. आम्ही गौरी, शाहीन, गझनवी आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत. त्यांचे लक्ष भारताकडे आहे.” असे म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने त्वरित कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबविण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना तेथून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि शिमला करार रद्द केला आहे.
पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्याची घोषणा Pahalgam Terror Attack ।
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या बैसरान खोऱ्यात झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, पाकिस्तानने युद्धासारखी तयारी सुरू केली आहे, ज्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली आणल्याची घोषणा केली आहे. या हालचालीचा उद्देश लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रांची जलद वाहतूक सुनिश्चित करणे आहे, जेणेकरून संभाव्य युद्धाच्या बाबतीत लष्करी तयारीत विलंब होणार नाही.
पाकिस्तान रेल्वे आता लष्कराच्या नियंत्रणाखाली Pahalgam Terror Attack ।
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांच्या मते, सर्व रेल्वे स्थानकांवर लष्करी डेस्क उभारण्यात आले आहेत. संपूर्ण लॉजिस्टिक्स व्यवस्था आता सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली आहे. गरजेनुसार आता रणगाडे, जड शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे थेट रेल्वेमार्गे हलवता येतील. अब्बासी यांनी पुढे बोलताना, “आमचे अधिकारी पूर्णपणे तयार आहेत आणि गरज पडल्यास ते सैन्याच्या सूचनांनुसार काम करतील.”असेहींची त्यांनी यावेळी म्हटले आहे.





