Pahalgam Attack : आधी आरशात तोंड पाहा.! असुदुद्दीन ओवैसी यांनी काढली पाकिस्तानची औकात

Pahalgam Attack – पाकिस्तान भारताला कधीच शांततेत राहू देणार नाही. आपण यांना चोख उत्तर देण्याची आज वेळ आहे. भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असल्याचे सांगणे म्हणजे भारताला कमी लेखणे आहे, असल्या काही वल्गना करण्यापूर्वी पाकिस्ताने आपले तोंड आरशात पहाणे गरजेचे आहे, असे म्हणत एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानची पुरती औकातच काढली.
ओवैसींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी पाकिस्तानचे कान टोचले आणि मिसाईल टेस्ट आणि कुरापतीविरोधात सणसणीत उत्तर दिले. ओवैसी म्हणाले, लक्षात ठेवा जेव्हा भारताकडे कुणी बोट दाखवतो त्यावेळी आम्ही आमचे राजकारण आणि सर्व गोष्टी विसरुन भक्कम दरवाजासारखे शत्रूंविरोधात उभे राहतो. आम्ही या सर्व लोकांना सांगतो की, आज तुम्ही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले आहे.
मला विश्वास आहे की, ज्या निष्पापांचा बळी गेला त्यांचे रक्त व्यर्थ जाणार नाही. मी सांगतो की, भारत सरकारने हा निर्णय घेतला की, पाकिस्तानची जहाज आणि पाकिस्तानची विमाने भारताच्या हद्दीत येणार नाहीत.
आम्ही हेही सांगतो की, पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायला हवे. जी लोकं पाकिस्तानात बसून भारताविरोधात काय काय बोलत आहेत त्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीवरही कठोर शब्दांत हल्ला चढवला.
ते म्हणाले, तुम्ही कोणत्या मिसाईल टेस्ट करता तर करा पण लक्षात ठेवा, भारत तुमच्यापेक्षा ताकदवर आहे आणि नेहमीच राहील. पाकिस्तान एक फेल देश आहे. त्यामुळे नेहमीसाठी एकदाची दहशतवादी विषवल्ली नाहीशी होईल.
भारतात एखादा फटाका जरी फुटतो तर ते याचा दोष पाकिस्तानवर लावतात. काश्मीरमध्ये जवळपास आठ लाख सैनिक आहेत, तरीही पहलगाम हल्ला झाला; म्हणजे याचा अर्थ हे सर्व बेकार आहेत.
लोकांची सुरक्षा करण्यास सैन्य सक्षम नाहीत, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदी म्हणाला होता. त्यावर ओवैसी यांनी शाहीद आफ्रिदीचा समाचार घेतला. ते म्हणाले, त्या जोकरचे नाव नका घेऊ. एवढे बोलून त्यांनी आफ्रिदीचा विषय संपवला आणि त्याच्यावर ताशेरे ओढले होते.





