पडळकरांनी शायराना अंदाजात लगावला विरोधकांना टोला,“कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”

कणकवली – शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आज कणकवली न्यायालयामध्ये शरण आले. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
यावरून विरोधी पक्षांकडून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. ,‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…’, असे म्हणत पडळकर यांनी उत्तर देत विरोधकांना उत्तर दिल आहे.
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी,
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…@NiteshNRane pic.twitter.com/OVPH4gQVFB— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 3, 2022
दरम्यान, जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्याय व्यवस्थेपुढे शरण यावे लागले आहे. नितेश राणे यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारण दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर दाखल झाले होते.
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारीच नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टानेही त्यांना दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर नितेश राणे यांना पुन्हा सिंधुदुर्गात परतावे लागले. सुरुवातील न्यायालयाने त्यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला आणि कडाडून विरोध केला. अखेर सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पोलिसांनी दिलेले सबळ पुरावे यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.18 डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला, अशी त्याने तक्रार दिली होती. त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी (पान 6 वर)
नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते, तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती. याप्रकरणी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खासगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.





