पडळकरांचे शंभूराज देसाई, नीलम गोऱ्हे विरोधात आक्षेपार्ह विधान; सभागृहात गदारोळ
Updated On:

मुंबई – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने विधान परिषदेचे कामकाज बुधवारी दोनदा तहकूब करावे लागले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू होती त्यावेळी हा गदारोळ उडाला. पडळकर यांनी देसाई यांचा उल्लेख करताना काही आक्षेपार्ह शेरेबाजी केली.
त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार सतीश चव्हाण यांनी पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. पण माफी मागण्यास पडळकरांनी नकार दिल्यानंतर गदारोळ असाच सुरू राहिला. विधान परिषदेतील अन्यही सदस्यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निषेध केला. त्यामुळे दोनवेळा विधान परिषदेचे कामकाज तहकुब करावे लागले.





